महिला अत्याचाराची आत्ताच काँग्रेसला आठवण झाली काय? Did the Congress remember the oppression of women just now?

 

महिला अत्याचाराची आत्ताच काँग्रेसला आठवण झाली काय? Did the Congress remember the oppression of women just now?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा हिंसक इतिहास समोर आणला. यावर उत्तर नसल्याने, मुनगंटीवार यांच्या भाषणावरून काँग्रेसने आंदोलन करीत ट्रोल करीत महिला अत्याचाराबद्दल जाब विचारत आहेत. महिला अत्याचाराबद्दल काँग्रेसने भाजपाला जाब विचारण्याचा अधिकार तरी आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे .

2019 मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सुभाष धोटे यांच्या वस्तीगृहातील 17 अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यावरून अनेकांवर गुन्हेही दाखल झाले. काँग्रेस नेत्यांनी हे प्रकरण राजकीय दबाव आणून मिटविण्याचा प्रयत्नही केला होता. तत्कालीन खासदार बाळू धानोरकर आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांनी एनडी हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेवरून आदिवासी पोक्सो अंतर्गत पैसे मिळावे म्हणून खोटे. बोलतात, पैशासाठी खोटे आरोप करतात असे जाहीर विधान केले होते. यावरून अनेकांवर गुन्हेही दाखल झाले. अल्पवयीन आदिवासी मुलींवर काँग्रेस नेत्यांच्या वस्तीगृहात अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कोणत्या काँग्रेस वाल्यांनी विरोधात आंदोलन केले? अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे वेळी गप्प बसलेले काँग्रेसवाले महिलांवरील अत्याचार कोणत्या तोंडाने बोलत आहे? असा प्रश्न आता मतदारांमध्ये उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या