विकासासाठी स्वतःला झोकुन देणारे नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ !!Sudhir Bhau is a leader who dedicates himself for development!!

 

Sudhir Bhau is a leader who dedicates himself for development!!

आज लोकसभा च्या निवडणुका लागलेल्या आहेत. राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात “आपले मत विकासासाठी...! विकसित भारताच्या उदयासाठी...!!” ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुधीरभाऊ मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहे. ६ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या भाऊंमध्ये 'व्हिजन' आहे. हे साऱ्यांनीच बघितले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करीत पक्षाने त्यांना राज्याचे वित्त - नियोजन सारख्या मंत्री पद सोपविले. त्यात त्यांनी विशेष कार्य केले. वनमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाला देशाच्या अग्रस्थानी नेऊन ठेवले. दिलेल्या कार्याचे सोने करण्यात सुधीरभाऊंचा कुणीही हात धरू शकत नाही. सांस्कृतिक मंत्री, मत्स्यव्यवसाय अशी अनेक कमी महत्वाची खात्यांमधील त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे. काँग्रेसचे तत्कालिन चंद्रपूर चे पालकमंत्री संजय देवतळे हे यांनी ही कधीकाळी सांस्कृतिक मंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. परंतु तेच खाते सुधीरभाऊ कडे आल्यानंतर नाराजी न बाळगता आज सांस्कृतिक मंत्री पदाच्या खात्याला त्यांनी न्याय दिला. यापुर्वी महादेव जानकर यांचेकडे असलेले मत्स्यव्यवसाय खाते आज मुनगंटीवारांकडे आहे. मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यात विशेष व नाविण्यपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. म्हणुनच आपण लोकप्रतिनिधी असतांना कोणती विकास कार्येकेलीत, घेतलेले निर्णय या मुद्यावर ते लोकसभा निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या सुद्धा वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहेत. त्यांचे दिवंगत पती बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूरात केलेल्या विशेष कार्याला मतदारांसमोर मांडून निवडणुक लढवावी, अशी अपेक्षा त्यांची आहे. आज पक्षाचा कार्यकर्ता-पदाधिकारी म्हणुन या निवडणुकीत त्यांचे कार्य करण्याची जवळून बघण्याची संधी मिळाली आहे. कार्य करण्याची विलक्षण दैवी शक्ती प्राप्त असलेले सुधीरभाऊ यांना थकवा येतांना किंवा कुणावर विनाकारण राग काढतांना मी त्यांना बघितले नाही. रात्रौ उशिरापर्यंत आलेल्या जनतेला भेटणे, निवडणुक संबंधात दिलेल्या जबाबदाऱ्या बघणे, सकाळी उठून पुन्हा त्याच कार्याला पुर्ववत सुरू करतांना त्यांच्या चेहऱ्यावर सकाळला दिसणारा उत्साह हाच रात्रौ उशिरापर्यंत बघायला मिळतो. हा दैवी गुणचं म्हणावा लागेल.

सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते, त्या वेळेला मी सरदार पटेल महाविद्यालयामध्ये शिकत होतो. तेंव्हा, सुधीरभाऊच्या भाषणांनी प्रभावित होऊन भाऊंना पाहण्यासाठी भाऊंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेलो असता भाऊंच्या जनता दरबारात जिल्ह्यातील अनेक लोक भाऊंना भेटण्यासाठी, वेगवेगळ्या सममस्या घेऊन येत असल्याचे मी बघितले. त्या भेटणाऱ्यांमध्ये मी पण एक होता. भाऊकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भाऊ भेटत होते आणि पोटतिडकीने त्यांच्या समस्या ऐकून घेत होते व त्या मार्गी लावण्याचा ते आटोक्याने प्रयत्न करीत होते आणि आज ही ती प्रथा सुधीरभाऊंच्या कार्यालयात अव्याहतपणे सुरू आहे. तेंव्हा पासून भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी व माझेसारखे अनेक युवक भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेत.

त्यावेळेसपासुन आजपावेतो राज्यात मोठ-मोठ्या पदांवर कार्य करण्याची सुधीरभाऊंना संधी मिळाली. मिळेल त्या संधीचे सोने करण्याची भाऊंची तऱ्हा काही न्यारीचं आहे. राजकारणासोबतचं समाजकारणाचे धडे ही भाऊंकडून गिरवायला हवे असेच आहेत. कितीही मोठ्या पदावर गेले तरी कार्यकर्त्यांना, सामान्य नागरिकांसोबत 'भाऊ' चे वागणे पुर्वीप्रमाणेचं आहे. म्हणुनचं प्रत्येक दिवसांमागे कार्यकर्त्यांमध्ये वाढ होत आहे आणि पक्षाला बळकटी मिळत आहे. आमच्यासारखे अनेक युवक सामाजिक ऊर्जा देणारे नेतृत्व म्हणुन पक्षासोबत जुळलो आहे. कधी एखादी समस्या घेऊन कार्यालयात गेलो तर त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे सुधीरभाऊंमधील कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

१९९५ पासून आजतागायत सुधीरभाऊ लोकप्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत आहे. या कालखंडात त्यांनी विकासाचा झंझावात चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण केला. मंत्री म्हणून सुधीरभाऊंनी समाजहिताचे अनेक निर्णय घेतले व जनमानसात स्वतःची आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभागृहात बुलंद होणारा त्यांचा आवाज अनेक प्रश्नांचा व समस्यांचा मार्ग सुकर व सुलभ करता झाला आहे. या दीर्घकाळात लोकहितकारी उपक्रमांची व विकासकामांची मोठी मालिका त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर निर्माण केली आहे. विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करून त्यांनी सरकारला अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. या निर्णयांची यादी सुद्धा मोठी आहे. नागपूर विद्यापीठाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याच्या गुरुदेव भक्तांच्या मागणीसाठी सुधीरभाऊंनी दोन वर्षे सतत संसदीय संघर्ष केला व त्या माध्यमातून सरकारने निर्णय घेतला. जनतेने आपले प्रश्न त्यांच्या समोर मांडायचे व त्यांनी संघर्ष करून ते सोडवायचे या समीकरणामुळे मोठा लोकसंग्रह या लोकनेत्याने निर्माण केला आहे.अगदी चांदा ते बांदा सुधीरभाऊंनी असंख्य माणसे भारतीय जनता पार्टीशी जोडली आहेत.

सुधीरभाऊंनी क्रांतिसूर्य व क्रांतीज्योतीच्या वारसांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी लढा दिला व त्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या मिळवून दिल्या. पुण्यातील भिडेवाड्याचा प्रश्न असो व माळी समाज बांधवांच्या मागण्या असो सुधीरभाऊंनी प्रयत्नांची शर्थ करत नेहमी यशस्वी पुढाकार घेतला. असे अनेक विषय आहेत जे त्यांनी विधानसभागृहाच्या माध्यमातून पूर्णत्वास आणले.

विकासकामांसाठी स्वतःला झोकून देत कार्य करणारा हा नेता विकासपुरुष या विशेषणाने सन्मानित केला जातो. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देत विकासाच्या मार्गावर या जिल्ह्याला अग्रेसर करण्याचे श्रेय सर्वस्वी सुधीरभाऊंना आहे. २०१४ ते २०१९ हा सुधीरभाऊंच्या अर्थमंत्री पदाचा कार्यकाळ राज्याला आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरला. चंद्रपूर जिल्ह्याला तर या काळात विकासासाठी जो निधी मिळाला तो पूर्वी कधीही मिळाला नव्हता. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे अर्थसंकल्प सुधीरभाऊंनी मांडले. सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून त्यांना दोन वेळा सन्मानित करण्यात आले, ही बाब महाराष्ट्रासोबतचं चंद्रपूर जिल्ह्याला गौरवान्वित करणारी आहे. वनमंत्री म्हणून त्यांनी दुर्लक्षित वनविभागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत महत्व प्रदान केले. त्यांनी राबवलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. लिम्का बुक, गिनीज बुक मध्ये ही वृक्षारोपण मोहीम विक्रम नोंदवती झाली. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजवर कोणत्याही वनमंत्यांनी घेतले नव्हते.

सांस्कृतिक कार्य मंत्री पदाची धुरा सांभाळताच शासकीय कार्यलयात हॅलो ऐवजी वंदेमातरम म्हणावे असा निर्णय घेणे ही बाब कौतुकास्पद आहे. चित्रपट, नाट्य आदी क्षेत्रांना न्याय देत गड किल्ल्याच्या संवर्धनावर त्यांनी भर दिला. शिव छत्रपतींची तलवार, वाघनखे परत आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न तर केवळ दिवास्वप्न आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून मत्स्यसंवर्धनावर त्यांनी भर दिला. भोई समाजाचे तलाव ठेक्याशी संबंधित प्रश्न असो मत्स्यबीज नुकसान भरपाई संबंधित प्रश्न असो त्यांनी ते तातडीने सोडवत या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परिणामी केंद्र शासनाच्या मत्स्यसंवर्धनाशी संबंधित समितीच्या सदस्यपदाची जवाबदारी त्यांना मिळाली.

त्यांनी मंत्री म्हणून घेतलेले प्रत्येक निर्णय हे अभिनंदनास पात्र आहे. त्यांचे मंत्री कार्यालय आयएसओ मानांकित करण्याचा निर्णय तर अर्थमंत्री पदाच्या काळात कौतुकाचा विषय ठरलाच, आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांचे मंत्री कार्यालय आयएसओ मानांकित करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

अशा या लोकनेत्यांसोबत छत्रछायेखाली कार्य करण्याची संधी माझ्यासोबत, आमच्या सारख्या अनेक युवकांना आज मिळत आहे, हे माझे सौभाग्य आहे. अत्यंत व्यस्तते ही सर्वसामान्यांच्या संपर्कात राहणे, त्यांचे दुरध्वनी उचलुन त्यांच्या समस्या काळजीपुर्वक ऐकून त्याचे समाधान करणे, हा सुधीरभाऊंमधला दैवीगुण अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशाने आज ते देशाच्या राजकारणात जिल्ह्याची सेवा करण्यासाठी उतरले आहेत. लोकसभेची निवडणुक लढवित आहे. जनता - जनार्दन मतदारांनी खोट्या आश्वासनांना, प्रलोभनाला बळी न पडता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याच गळ्यात विजयाची माळ टाकतील, असा मला पुर्ण विश्वास आहे.

 मनोज पोतराजे

जिल्हाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा चंद्रपूर जिल्हा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या