युवा सेना चंद्रपूर शहर प्रमुखाची हत्या Youth Sena Chandrapur City Chief Killed


Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Yuva Sena Chandrapur City Chief Shiva Milind Vazarkar

चंद्रपूर |  अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर याची आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, पोलीस तपास सुरु. ; हत्येचे कारण अस्पष्ट, 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझरकर हे आज रात्री 9:00 वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात वझरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वझरकर यांची हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

वझरकर हे चंद्रपूर शहरातील शिवसेना युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. त्यांच्या हत्येने चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे.

चंद्रपूर शहरात उबाठा युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या उघडकीस आली आहे. उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची जोरदार मोडतोड केली. पोलिस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आलाय. उबाठा गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाजवर्तविण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केले आहे. उबाठा गटाने आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या