हिराई विश्रामगृहात मुख्य अभियंताचे आदेश्याने १५ लोकांचे वास्तव्य abcdbaba

 

हिराई विश्रामगृहात मुख्य अभियंताचे आदेश्याने १५ लोकांचे वास्तव्य

चंद्रपूर | थर्मल पॉवर स्टेशन मध्ये असलेल्या हिराई विश्रामगृहात फक्त आमदार, मंत्री, सिटीपीएसचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्हीआयपी गेस्ट हाऊस देण्यात येते मात्र महाजनकोचे अधिकारी यांनी मुख्य अभियंता (स्थापत्य) होळंबे यांनी शासकीय दौरा दाखवून व्हिआयपी श्युट केले.ते दौऱ्यावर न येता त्यांनी आपल्या संबंधातील लोकांना ताडोबा पर्यटनासाठी थांबविले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या १५ पाहुण्यांची जेवणासह निवासाची व्यवस्था केल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.


हिराई विश्रामगृह फक्त प्रतीष्टीत व्यक्ती, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महाजनको अधिकारी यांनाच देण्यात येतात,महाजनकोचे मुख्य अभियंता (स्थापत्य) होळंबे मुंबई यांनी आपला दिनांक ९ आणि १० मार्च २०२४ रोजी शासकीय दौरा दाखविला मात्र त्यांनी आपला दौरा रद्द करीत त्या व्हीआयपी रुम मध्ये आपले नातलगांना वास्तव्यास ठेवले.त्यांचे नातलग ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीसाठी आले होते.त्यात डॉ मधूसुदन काळे, अनिकेत काळे यांच्यासह १५ लोकांंनी, दोन दिवस व्हीव्हीआयपी श्युट उपभोगले, मुख्य अभियंता होळंबे यांनी आपला पदाचा दुरूपयोग करीत नियम धाब्यावर बसविला आहे.इतकेच नव्हे तर त्यांनी निवासाची मोफत व्यवस्था केलीच मात्र स्वादिष्ट जेवणाचा ही व्यवस्था करून दिली, त्याच्या सोयी युक्त सुविधांमुळे नातेवाईकांनीही धन्यता मानली.

मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार हे सर्व व्यवस्था करण्यात येते, त्यांच्या देखरेखीत उपमुख्य अभियंता हे हिराई विश्रामगृहाचे देखरेख करतात.उपमुख्य अभियंता शिंदे हे विश्रामगृहाच्या खानसामा ( भोजन बनविणारे) यांना आदेश दिल्याशिवाय जेवण बनवत नाही मात्र त्यांच्या आदेशानुसार या सर्व पाहुण्यांची स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था सिटीपीएसच्या तिजोरीतून केली, उपमुख्य अभियंता शिंदे स्वता गेल्या सात महिन्यांपासून हिराई विश्रामगृहात जेवण करीत आहे.


जनसामान्यांसाठी सिटीपीएसचे वेगळे नियम आणि अधिकाऱ्यांसाठी वेगळे असल्याने 

सदर बाबींची योग्य चौकशी करण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या