स्थागुशा (एलसीबी) च्या कारवाईने अपराध्यांचे धाबे दणाणले !The action of Sthagusha (LCB) has shocked the criminals!

 

शिवा वझरकर हत्या प्रकरण...!  चंद्रपूर (वि. प्रति . )  प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख शिवा वझरकर याच्या हत्येने चंद्रपूरात अपराधाच्या वाढत्या संख्येने जिल्हा ढवळून निघाला, त्यानंतर २४ तासाच्या आत पोलिसांनी शिवा च्या हत्या प्रकरणातील राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगार प्रवृतत्तीच्या स्वप्निल काशिकर सहित ७ आरोपींना अटक केली. अटकेत आरोपींना पोलिसांकडून नरमाईची वागणुक देत असल्याचा आरोप मृतकाच्या वडीलांनी पालकमंत्री नाम. मुनगंटीवार यांच्याकडे केला. यामुळे पालकमंत्र्यांनी संतापुन सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे देण्यात आला. त्यातच नविन पोलिस अधिक्षकांचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या नविन पोलिस अधिक्षक ममुक्का सुदर्शन यांनी या हत्या प्रकरणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी रामनगर पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या तपासाची सुत्रे हाती घेता क्षणीचं आरोपींचा तिन दिवसांचा पिसीआर घेवून आरोपीच्या कार्यालयातुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यानंतर आणखी दोन दिवसांचा पिसीआर घेण्यात आल्यामुळे अपराध्यांचे धाबे दणाणले आहेत. महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाचे प्रतिभा उंचावली असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात राजकीय वरदहस्त प्राप्त अपराध्यांचे प्रस्थ या कारवाईमुळे नक्कीच कमी होईल अशी चर्चा आता होऊ लागली आहे.  हत्या घडल्यानंतर आरोपींनी कुणा-कुणाशी संपर्क साधला, त्यांना कुणी - कुणी मदत केली या सर्व बाबींचा तपास एलसीबी पथकाने केल्यास मोठे घबाड उडकीस येऊ शकते, अशी चर्चा आता वर्तविल्या जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा बाळगण्याचा काय हेतु असु शकतो? आरोपींचे कुणाशी आर्थिक लेण देण आहे काय ? या सर्व बाबींचा उलगडा कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथक अवश्य करतील. अशी जनतेला अपेक्षा आहे. चंद्रपूरात रेती, कोळसा, क्रिकेट सट्टा, बंदी असलेला सुगंधित तंबाखु चा व्यापार मोठ्या प्रमाणात पोलिस विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. या व्यवसायातुन मोठी माया जमविण्याच्या मोहाने अनेक आपराधीक प्रवृत्तीने राजकीय वशिल्याने प्रवेश केला आहे. त्या सर्व अपराधिक प्रवृत्तींवर वचक बसविण्यासाठी एलसीबी पथकाने कोणतीही हयगय न करता या प्रकरणाचा तपास करायला हवा, जेणेकरून दुसरा शिवा वझरकर अपराधी प्रवृत्तीचा बळी जाणार नाही. तुर्तास एवढीचं अपेक्षा महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाकडून व नविन पोलिस अधिक्षकांकडून नागरिक बाळगत आहे.

शिवा वझरकर हत्या प्रकरण...!

चंद्रपूर (वि. प्रति . )

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख शिवा वझरकर याच्या हत्येने चंद्रपूरात अपराधाच्या वाढत्या संख्येने जिल्हा ढवळून निघाला, त्यानंतर २४ तासाच्या आत पोलिसांनी शिवा च्या हत्या प्रकरणातील राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगार प्रवृतत्तीच्या स्वप्निल काशिकर सहित ७ आरोपींना अटक केली. अटकेत आरोपींना पोलिसांकडून नरमाईची वागणुक देत असल्याचा आरोप मृतकाच्या वडीलांनी पालकमंत्री नाम. मुनगंटीवार यांच्याकडे केला. यामुळे पालकमंत्र्यांनी संतापुन सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे देण्यात आला. त्यातच नविन पोलिस अधिक्षकांचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या नविन पोलिस अधिक्षक ममुक्का सुदर्शन यांनी या हत्या प्रकरणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी रामनगर पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या तपासाची सुत्रे हाती घेता क्षणीचं आरोपींचा तिन दिवसांचा पिसीआर घेवून आरोपीच्या कार्यालयातुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यानंतर आणखी दोन दिवसांचा पिसीआर घेण्यात आल्यामुळे अपराध्यांचे धाबे दणाणले आहेत. महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाचे प्रतिभा उंचावली असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात राजकीय वरदहस्त प्राप्त अपराध्यांचे प्रस्थ या कारवाईमुळे नक्कीच कमी होईल अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

हत्या घडल्यानंतर आरोपींनी कुणा-कुणाशी संपर्क साधला, त्यांना कुणी - कुणी मदत केली या सर्व बाबींचा तपास एलसीबी पथकाने केल्यास मोठे घबाड उडकीस येऊ शकते, अशी चर्चा आता वर्तविल्या जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा बाळगण्याचा काय हेतु असु शकतो? आरोपींचे कुणाशी आर्थिक लेण देण आहे काय ? या सर्व बाबींचा उलगडा कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथक अवश्य करतील. अशी जनतेला अपेक्षा आहे. चंद्रपूरात रेती, कोळसा, क्रिकेट सट्टा, बंदी असलेला सुगंधित तंबाखु चा व्यापार मोठ्या प्रमाणात पोलिस विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. या व्यवसायातुन मोठी माया जमविण्याच्या मोहाने अनेक आपराधीक प्रवृत्तीने राजकीय वशिल्याने प्रवेश केला आहे. त्या सर्व अपराधिक प्रवृत्तींवर वचक बसविण्यासाठी एलसीबी पथकाने कोणतीही हयगय न करता या प्रकरणाचा तपास करायला हवा, जेणेकरून दुसरा शिवा वझरकर अपराधी प्रवृत्तीचा बळी जाणार नाही. तुर्तास एवढीचं अपेक्षा महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाकडून व नविन पोलिस अधिक्षकांकडून नागरिक बाळगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या