कशाला रॅली काढता ? रामभक्तांच्या रॅलीवर प्राणघातक हल्ला Why do you rally? Assault on rally of Ram devotees

शिवसेना (उबाठा) गटाच्या गणेश चिडे यांच्यावर गुन्हा दाखल !


चंद्रपूर (वि. प्रति. )
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना होणार आहे. संपूर्ण भारतामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले असुन काही विघ्नसंतोषींना ही बाब मुळातचं सलत आहे. अश्याच द्वेष भावनेतुन संतापजनक प्रकार वरोरा तालुक्यातील शेगाव येथे घडला असुन उद्धव ठाकरे गटाचे वरोरा-भद्रावती विधानसभा जिल्हाध्यक्ष मुकेश जिवतोडे यांचे कट्टर समर्थक शिवसेना (उबाठा) गटाचे सोशल मिडीया प्रमुख गणेश चिडे यांनी रामभक्तांच्या राममंदिर कलश यात्रेमध्ये सहभागी रामभक्तांवर प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यात गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य श्रावण चवरे गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.


 राजकीय द्वेष बाळगुन शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गणेश चिडे, दामोधर चिडे, सचिन चिडे यांचेवर शेगांव पोलिस स्टेशन येथे भादंवी ३०७, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन वृत्त लिहीत्सोवर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही राजकीय दबावात न येता पोलिसांनी त्वरित या विघ्नसंतोषी आरोपींना अटक करून पोलिसी हिसका दाखवावा, जेणेकरून असले प्रकार पुन्हा घडणार नाही व भक्तीमय वातावरणाला राजकीय द्वेषातुन गालबोट लागणार नाही यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी रामभक्तांकडून होत आहे.


सविस्तर वृत्त असे की, वरोरा तालुक्यातील शेगाव येथील बोडखा (मो.) येथील रामभक्तांनी राम मंदिर कलश यात्रा काढली. या रॅलीमध्ये गावातील गुरूदेव सेवा मंडळाचे गावातील सदस्य श्रावण लक्ष्मण चवरे सह अंदाजे २०० रामभक्त सहभागी झाले होते. गजानन महाराज मंदिर पासुन सुरू झालेली ही रामभक्तांची ही रॅली बेघर वस्तीपर्यंत पोहोचली असतांना बेघर वस्तीमध्ये गावातील शिवसेना (उबाठा) गटाचे गणेश, दामोधर चिडे व सचिन चिडे यांनी कशाला रॅली काढता ? असे म्हणत रामभक्तांच्या या रॅलीवर हल्ला चढविला. रॅलीमधील गुरूदेव सेवा मंडळाच्या श्रावण चवरे यांच्या मानेवरून हात फिरवत त्यांना धारदार वस्तुने जखमी केले. या हल्ल्यात श्रावण चवरे हे गंभीर जखमी झाले असुन ते एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या प्रकारामुळे रामभक्तांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या शिवसेना (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन असा प्रकार इतरत्र पुन्हा कुठे घडू नये यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलावीत अशी भावना रामभक्तांमध्ये व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या