नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा Citizens should take advantage of Stamp Duty Abhay Yojana

 


चंद्रपूर, दि. 16: शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना -2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत दोन टप्यात लागू केली आहे.

नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा


पहील्या टप्प्यात 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास रुपये 1 ते 1 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 100 टक्के माफी दिली आहे. तसेच 1 लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कास 50 टक्के माफ व दंड 100 टक्के माफ केला आहे. त्याचप्रमाणे, रुपये 1 ते 25 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 25 टक्के व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90 टक्के माफी दिली आहे. दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 25 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे. तसेच रुपये 25 कोटीपुढील जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या मुद्रांक शुल्कामध्ये 20 टक्के सवलत व दंडामध्ये फक्त रुपये 1 कोटी भरावयाचे आहे. त्यापुढील रकमेसाठी सवलत देय आहे.

नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा


 दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास रुपये 1 ते 1 लाख इतक्या फरकाच्या रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 80 टक्के माफी दिली आहे. तसेच 1 लाखापेक्षा जास्तचे प्रकरणात मुद्रांक शुल्क 40 टक्के व दंड 70 टक्के माफ केलेला आहे. त्याचप्रमाणे, रुपये 1 ते 25 कोटी इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क 20 टक्के सवलत व दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा कमी असल्यास 80 टक्के माफी आणि जर दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये 50 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे. तसेच 25 कोटीपेक्षा जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 10 टक्के सवलत व दंड जास्तीत जास्त 2 कोटी रुपये भरावा लागेल व त्यापुढील रकमेस सवलत देय आहे. 

शासनामार्फत सुरु असलेल्या “अभय योजना-2023” अंतर्गत दंड सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. कार्यालयामार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत नोटीस प्राप्त झालेली आहे, त्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, हॉल क्र.4,चंद्रपूर या कार्यालयात किंवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करावा,असे आवाहन चंद्रपूरच्या मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या