श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथील रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळा इंदिरानगरात आनंदात साजरा Ramlalla Pran-Pratishta Sohala at Sri Ram Janmabhoomi Temple, Ayodhya Celebrated in Indiranagar



पूजापाठ, बुंदी वाटप व फटाक्यांच्या जल्लोषात जय श्रीरामाचा एकच जयघोष

Ramlalla Pran-Pratishta Sohala at Sri Ram Janmabhoomi Temple, Ayodhya Celebrated in Indiranagar


चंद्रपुर : श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथील रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण होते. या उत्सवात व उत्साहात इंदिरा नगरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत रेल्वे पटरी चौकात भक्तिमय वातावरण निर्माण केले. आठवडा भरापासूनच साफ स्वच्छता, राम-धून, हनुमान मंदीरात पूजापाठ आदी उपक्रमातून रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचे उत्साही व धार्मिक वातावरण तयार केले.

आज (दि.२२) ला श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथे रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, स्थानिक रेल्वे पटरी चौकात रामाचा प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन, पुजा, अर्चना, करण्यात आली तथा इंदिरानगर चौकात बुंदी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिसरातील या भक्तिमय वातावरणात शेकडो जनतेनी सहभाग नोंदविला व महाप्रसादाचा लाभ घेतला. १२:२० ला रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा होताच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. जय श्रीरामचा एकच जयघोष परिसरात घुमू लागला. अत्यंत उत्साही व प्रसन्न वातावरणात सामाजिक एकोपा वाढवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी एकनाथ चवरे महेश तिरूले अरविद नन्नावरे बाबा रोही गुड्डू डिकोंडावार संतोष बुटले विठ्ठल धंदरे सोनू तिरुले नन्नावरे प्रभाकर वाघ चंदू हांडे आरती तिरूले मला ननावरे वनिता चवरे पप्पू बोपचे पिजदुरकर यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या