१५ ऑगस्टला घोडाझरी तलावावर जात असाल तर थांबा Stop by if you are going to Ghodazari Lake on Independence Day


नागभीड  : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ध्वजारोहण झाल्यावर परिसरातील पर्यटक घोडाझरी तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे यावर्षी नागभीडच्या प्रादेशिक वन कार्यालयाने १५ ऑगस्टला घोडझरी तलावावर जाण्यास प्रवेश बंदी घातली आहे.... Stop by if you are going to Ghodazari Lake on Independence Day
Stop by if you are going to Ghodazari Lake on Independence Day


नागभीडपासून ७ किमी अंतरावर असलेला मुख्य प्रवेशद्वार व किटाळी (खडकी) येथील प्रवेशव्दार बंद असणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने चारचाकी वाहनांचा पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. त्याच बरोबर पर्यटक आपल्यासोबत खाण्याचे साहित्य आणत असून, त्याचा वापर झाल्यावर वनात तसेच टाकून निघून जातात. त्यामुळे वनात अस्वच्छता निर्माण होऊन वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत असतो. तसेच घोडाझरी वनात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. या दिवसी पुरेसा पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नाही. ग्रामपंचायत किटाळी (बोरमाळ) व बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांकडूनसुद्धा घोडाझरी तलावात प्रवेश बंदी करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. जर कोणी बळजबरीने प्रवेश करेल त्याच्यावर कार्यवाही होणार असल्याचे वनाविभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या