सिटीपीएसच्या चुकीच्या नियोजनामुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका Govt due to wrong planning of CityPS




संरक्षण भिंतीच्या कामात माती मिश्रित रेतीचा वापर



चंद्रपूर | थर्मल पॉवर स्टेशन मधील ऊर्जा निर्माण करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या कोळशाच्या जळून खाक झालेली राख निर्मिती क्षेत्रापासून दुर असलेल्या डेपोत जमा केली जाते. त्या डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याचे अनेकदा दुरुस्ती करण्याच्या नावाखाली निधी देण्यात आला.मात्र रस्ता जैसे थे ची स्थिती आहे.या राख डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर इरई नदी आहे.त्या नदीवर जुना पुल आहे मात्र ते क्षतीग्रस्त झाल्याने दुसरे पुलाची निर्मिती केली आहे.त्या नदीवर उंच पुल बांधण्यात आले आहे.इतके मोठे उंच पुल बांधण्याची गरज नव्हती मात्र अभियंत्यांनी मलाई लाटण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.अभियंत्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका बसला आहे.
ॲशबंड कडे जाण्यासाठी एकेरी रस्ता आहे.आणि या रस्त्यावर रहदारी नसते.वरीष्ट अधिकारीही राख डेपोकडे जात नाही त्याचाच फायदा घेत स्थापत्य विभागाचे अभियंत्यानी उंच पुलाची निर्मिती केली.पुल इतका उंच बनविण्यात आले आहे.कि त्या पुलावरून समोरून वाहन येत असल्याचे दिसत नाही.समोरून वाहन आलेच तर आजूबाजूला रस्ताच नाही.वाहने मागे पुढे करायलाही जागा नाही.फक्त एकच वाहन जाऊ शकते इतका रस्ता बनविण्यात आला आहे.हा पुल करोडो रुपये खर्च करून करण्यात आले होते तर रस्ता रुंद बनविणे आवश्यक होते.भविष्यात जर या पुलावरून दोन वाहन गेले तरी निघू शकले असते.त्यामुळे अभियंत्यांनी या उड्डाण पूल निर्मितीत करोडो रुपयांची मलाई लाटण्याचा प्रताप केल्याची ओरड सध्या सुरू झाले आहे.या अभियंत्याने अनेक कामाची मलाई लाटल्याचे बोलल्या जात आहे.

( भाग २ भ्रष्टाचाराची ४० वर्ष )




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या