सिएमडि च्या दौऱ्याने सिटीपीएसचे रस्ते चकाकले CMD's visit brightened the streets of CityPS


स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंतांचे नावाने झाली कंत्राटदारांकडून वसूली ?

चंद्रपूर | थर्मल पॉवर स्टेशन हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले या ठिकाणी एकाच कामाचे वर्षभरात दोनवेळा कामे करण्यात येतात.सौदामिनी चौक ते ऊर्जा भवन पर्यंत जाणारे रस्ता असो व्हा उर्जा भवन, वसाह व निर्मिती परीसरातील कामे असोत ती कामे फक्त कागदावर दाखवून थातूरमातूर कामे केली जातात.प्रकाशगडचे मुख्य अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.डॉ.पी.अलबनगन यांच्या शनिवारी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये दौरा नियोजित आहे.त्यामुळे थर्मल पॉवर स्टेशन मधील निकृष्ट कामे झाकण्यासाठी त्या कामावर डांबराचा मुलामा चढविण्यात येत आहे.

सौदामिनी चौक ते ऊर्जा भवन पर्यंतचा रस्ता वर्षभरापूर्वी करण्यात आले होते.ते रस्ता अवघ्या महीणाभरात उखडले गेले मात्र अधिकाऱ्यांनी डोळे बंद करून कामाच्या बिलावर सही दिले.कामाच्या निधीची उचल करून अधिकारी व कंत्राटदारांनी "तेरी भी चूप मेरी भी चूप"करीत चुपी साधली.या रस्त्याने दररोज हजारो कर्मचाऱ्यांसह मुख्य अभियंता जात असतात, मात्र आजपर्यंत रस्ता उखडल्याच्या कारणावरून कंत्राटदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.वर्षभरातच पुन्हा त्याच रस्त्याचे सिएमडी दौऱ्याचे निमीत्ताने डांबराचा मुलामा चढविण्यात येत आहे.

इतकेच नव्हे तर स्थापत्य (सिव्हिल) विभागाचे अधिक्षक अभियंता (कॅबिन) यांचे कार्यालय वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आले.पुन्हा त्याच कार्यालयाचे महीण्याभरापासून नुतनीकरण करण्यात येत आहे . चांगले स्थितीत असलेल्या कार्यालयाचे तोडून मोडून नुतनीकरण करीत असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.अधिक्षक अभियंता कॅबिन मध्ये स्वच्छता गृह चांगल्या स्थितीत असतांनासुध्दा ते तोडून दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आले.नविन बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे खोदकाम न करता नुसता विटा लावून भिंत चढविण्यात आली असल्याची माहिती आहे.वर्षभरात दोन वेळा करण्यात येणाऱ्या बांधकामाबाबत अनेकदा मुख्य अभियंता यांना विचारण्यात आले मात्र चौकशी करून आपणास सांगू अशी माहिती देण्यात आली.मात्र आयतागायत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही.चौकशी न करण्याचे गुपीत अजूनही गुलदस्त्यातच आहे.

स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंतांचे नावाने झाली कंत्राटदारांकडून वसूली ?

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन अंतर्गत चालणारे अनेक सिव्हिल विभागाचे कामे स्थापत्य विभागाकडून केल्या जाते.स्थापत्य विभागाचे स्वतंत्र विभाग आहे. या विभागाचे मुख्य अभियंता मुंबई प्रकाशगडावर बसले आहेत.नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे.सर्व मंत्रालय नागपुरात आले आहे.प्रकाशगडचे सर्व अधिकारीही नागपुरात बसले आहेत. नुकताच ॲशबंडचे विस्तारीकरणाचे काम दोनशे कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आहे.यासाठी नियम धाब्यावर बसवून एक अभियंता या कामासाठी धडपड केली आणि ती धडपड यशस्वी झाली.त्या माध्यमातून मिळणारे कमिशन ही मिळाल्याची चर्चा आहे.नुकताच मुख्य अभियंता यांचे नावाने सर्व कंत्राटदारांकडून वसूली करून मुख्य अभियंता यांना देण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या